लंडन दि.१२ – लंडनमध्ये इतिहासात प्रथमच ब्रिटीश गोरे अल्पसंख्याक बनले असून लंडनमध्ये स्थलांतरीत होऊन आलेल्या अन्य देशातील नागरिकांच्या तुलनेत या गोऱ्यांची संख्या घटली असल्याचे नुकत्याच झालेल्या जनगणनेत दिसून आले आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ सालच्या जनगणनेत ब्रिटीश गोऱ्यांची संख्या ४३ लाख होती.ही संख्या २०११ च्या जनगणनेत ३७ लाखांवर आली आहे. लंडनच्या लोकसंख्येत त्यांचे प्रमाण ४४.९ टक्के इतके असून यूकेच्या कोणत्याही भागात ब्रिटीश गोरे अल्पसंख्याक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
लंडनमध्ये गोरे अल्पसंख्याक
लंडनची लोकसंख्या ७५ लाखांवर असून त्यात परदेशी जन्म झालेल्यांचे प्रमाण एकास आठ असे आहे. इंग्लंड आणि वेल्श यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५६.१ टक्के इतके असून त्यात ७ टक्के वाढ झाली आहे. दशकापूर्वी इंग्लंड आणि वेल्श लोकसंख्येत गोऱ्यांची प्रमाण ९१.३ टक्के इतके होते ते आता ८६ टक्क्यांवर आले आहे. लंडनमध्ये स्थलांतरीतांत ३७ टक्के लोक परदेशात जन्मलेले आहेत तर २७ टक्के यूकेचे नागरिक नाहीत. लंडनमध्ये स्थलांतरीत होऊन आलेल्यात पोलंडचे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच भारत,पाकिस्तान, आयर्लंड आणि जर्मनीतून आलेल्यांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे या जनगणनेतील आकडेवारीवरून दिसून आले आहे.
