केजरीवाल यांना पाठींबा नाहीच: अण्णा हजारे

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा प्रश्नच येत नसून त्याची कारणे मी उघड केली तर ते अधिक अडचणीत येतील; असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सरकारने सक्षम लोकपाल विधेयक संमत केले नाही; तर सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

अण्णांचे एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत अण्णांनी सतत उलट सुलट विधाने केल्याबद्दल त्यांना विचारले असता अण्णांनी आपला केजरीवाल यांच्या पक्षाला पाठींबा नसल्याचा पुनरुच्चार केला. त्यांच्या विरोधाची करणे स्पष्ट करण्यासही अण्णांनी नकार दिला.

आपण कधीही कोणाला त्यांच्या उमेदवाराला मते द्या; असे सांगितले नाही. राजकारणावर माझा विश्वास असता तर मीच यापूर्वी निवडणुका लढविल्या असत्या; असेही ते म्हणाले. गैरसमज दूर झाल्यावर अण्णा आमच्याबरोबर असतील; हे केजरीवाल यांचे भाबडे स्वप्न आहे; अशा शब्दात अण्णांनी केजरीवाल यांना फटकारले.

आपल्या आंदोलनाची आगामी दिशा स्पष्ट करताना अण्णा म्हणाले की; मी लोकपालाच्या शासकीय विधेयकाचा अभ्यास करीत आहे. ते सक्षम नसेल तर पुन्हा जोरदार आंदोलन पुकारले जाईल. त्यापूर्वी देशभर दौरा करणार असून या दौर्यात सध्याचे सरकार घटनेचा सन्मान करणारे नाही; याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाईल; असेही अण्णांनी सांगितले.

Leave a Comment