टीम इंडियाची सत्वपरीक्षा पाहणारा काळ

कोलकाता कसोटी जिंकून इंग्लंड संघाने टीम इंडियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. १९८४ नंतर भारतात कसोटी विजयची संधी सुमारे २८ वर्षानंतर इंग्लंडसाठी चालून आली आहे. भारतीय खेळपट्टीवर शेर असलेल्या टीम इंडियाला गेल्या काही वर्षात प्रथमच असा मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला आहे. या दोन सलग पराभवामुळे ‘धोनी ब्रिगेड’साठी येणारा काळ हा निश्चितच सत्वपरीक्षा पाहणारा असणार आहे. नागपूर येथील चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची कस लागणार आहे. ही कसोटी मलिका बरोबरीत सोडविन्यासाठी आता नागपूर येथील शेवटच्या सामन्यात विजयच आवश्यक आहे.

पहिल्या कसोटी सामान्यत विजय मिळवून भारतीय संघाने सर्वांच्या अपेक्षा वाढविल्या होत्या. त्यामुळे टीम इंडिया गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढेल असे वाटत होते. मात्र तसे काहीच घडले नाही. सिनियर खेळाडू लक्ष्मण व राहुल द्रविडची उणीव टीम इंडियाला त जाणवू लागली आहे असे वाटते. लक्ष्मण व राहुल द्रविड हे संघात असताना भारतीय संघ धावाचा डोंगर उभा करीत होता. मात्र गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाला एक एक धाव काढान्यासाठी झुंजावे लागत आहे.

टीम इंडियाची ओपेनिंग गेल्या तीन ही सामन्यात म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे ओपेनिंग बाबत प्रशनचिन्ह निर्माण झाले आहे. सेहवाग आणि गंभीरला गेल्या तीन सामन्यात एक अपवाद वगळता सूर गवसलेला नाही. दोघेही विकेट फेकत आहेत. मधल्याफळीत चेतेश्वर पुजारची कामगिरी चंगली होत आली तर कलकता सामन्यात तो फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. सचिनने कलकत्त कसोटीत पहिल्या डावात जरी चांगली फलंदाजी केली असली तरी दुस-या डावात त्याला चांगला खेल करता आले नाही. त्यमुळे गेल्या काही दिवसापासून टीम इंडियावरील प्रेशर आणखीन वाढत आहे. त्यानंतर विराट कोहली आणि युवराज सिंग अपयशी ठरले आहेत. त्यांना आपल्या जिगरबाज खेळाची चुणूक दाखवता आली नाही. तर गेल्या काही दिवसापासून कर्णधार धोनीला निर्णयाक खेळी करता आली नाही.

कालकत्याची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी मुंबईएवढी ‘टेरर’ वाटत नसली तरी या खेळपट्टीवर चेंडू फिरू लागला होता. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात टीम इंडियाच्या गोलदाजाना अपयश आले आहे. इंग्लंडचे फलंदाज पाय रोवून खेळ करीत असतना त्यांना बाद करणे अवघड जात आहे. इंग्लंड संघ गोलंदाजांना दादच देत नाही. टीम इंडियाची गोलंदाज गेल्या दोन कसोटी सामन्यात एकाएक निष्प्रभ ठरली आहे. पहिल्या सामन्यात डावाने पराभूत करणारी हीच टीम इंडिया का असा प्रश्न पडला आहे.

झहीर खान अथवा ईशांत शर्मा या जोडीला स्विंग करण्यात अपयश आले आहे. तर ओझा व अश्विनाच्या स्पिनची कमाल पाहत येत नाही. फलंदाज बाद करण्यसाठी प्रेक्षकांना झुंजावे लागते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाच्या गोलदाजना विकेटसाठी झुंजावे लागत आहे. या मालिकेवर ऍलिस्टर कूकचा संपूर्णपणे प्रभाव असला तरी आपल्या गोलंदाजांनी ट्रॉटसारख्या अपयशाच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेल्या ‘फ्लॉप’ फलंदाजाला धावा करण्याची संधी दिली. फिल्डिंग बाबतही टीम इंडिया मघेच आहे. कलकता कसोटीत पुजाराने स्लीपमध्ये १७ धावावर असतना सोडलेला झेल महागात पडला त्यामुळेच त्याने १९१ धावा केल्या या धावा महागात पडल्या.

या सलग दोन सामन्यात झालेल्या पराभवातून भारतीय संघाने काही तरी बोध घ्याला हवा आहे. आगामी काळात फार निराश न होता धीर महत्त्वाचा होता. आगामी सामना खेचून आणण्याची संधी मिळाली असती. कलकता येथील सामना जिंकताना इंग्लडने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या दोन सलग पराभवामुळे ‘धोनी ब्रिगेड’साठी येणारा काळ हा निश्चितच सत्वपरीक्षा पाहणारा असणार आहे. नागपूर येथील चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला आता विजयच आवश्यक आहे.

Leave a Comment