अजित पवारांच्या शपथविधी विरोधात मोर्चा

नागपूर: विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी मूकमोर्चा काढला. उपमुख्यमंत्री हे पद घटनेतच नसताना पवारांचा शपथविधी झालाच कसा; असा सवाल विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी आमदारांनी काळे झेंडे आणि पवारांच्या विरोधाचे फलक घेऊन मोर्चा काढला.

विधानसभेचे काम सुरू होताच खडसे यांनी अजित पवारांच्या शपथविधीला आक्षेप घेतला. पवार यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते.

या अधिवेशनात सिंचन श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.

Leave a Comment