करायला गेले एक झाले भलतेच

पिना कोलाडा कॉकटेल ऑस्ट्रेलियात फारच लोकप्रिय असून यासाठी मुख्यत्वे उपयोगात आणले जाणारे अननस हे तेथील मुख्य फळ आहे. ऑस्ट्रेलियात दरवर्षी ८० हजार टन अननस उत्पादन होते मात्र तरीही बाहेरून अननस आणावे लागतातच. यावर उपाय शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन कृषी संशोधकांनी गोड, रसदार अननसाचे उत्पादन करण्याचा निश्चय केला आणि तब्बल दहा वर्षे त्यासाठी खर्ची घातली. असा अननस त्यांनी तयार करण्यात यशही मिळविले मात्र या अननसाची चव खोबर्यारसारखी असून त्याला खोबर्या चाच वास येतो आहे.

क्वीन्सलँड येथील फळबाग तज्ञ गर्थ सॅनॅव्हस्की या संबंधी बोलताना म्हणाले की आम्हाला वास्तविक अननसाच्या पारंपारिक वासाशिवाय अन्य कोणत्याच  वासाचा अननस अजिबात बनवायचा नव्हता. मात्र आम्ही केलेल्या विविध प्रयोगातून जो अननस तयार झाला तो रसदार आहे, गोड आहे पण खोबर्यायच्या वासाचा आहे. त्याला चवही खोबर्यालचीच आहे. शेतकर्यांणनी या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून येत्या दोन वर्षात या अननसाचे प्रंचड पीक येईल असा अंदाज आहे.

अर्थात ऑस्ट्रेलियात लोकप्रिय असलेल्या पिना कोलाडा कॉकटेलच्या कृतीत रम बरोबरच खोबर्यादचे क्रिम आणि अननसाचा रस बर्फासह सर्व्ह केला जातो. आता खोबर्याखचा वास आणि चव या अननसाला आहेच त्यामुळे कॉकटेल बनविताना मुद्दाम खोबर्‍याचे क्रिम वापरायला नको हा यातला एकमेव फायदा. अननस आयात करावे लागू नयेत आणि देशातच स्वस्त, दर्जेदार अननस तयार करावेत यासाठी हे प्रयोग केले जात होते.