नवी दिल्ली:संसदेवरील हल्ला प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरु याच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यात येईल; असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
नवी दिल्ली:संसदेवरील हल्ला प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरु याच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यात येईल; असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
अफजल गुरूचा दयेचा अर्ज पुनर्विचारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून गृह विभागाकडे परत पाठविण्यात आल्याचे शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर गुरूच्या अर्जाबाबत निर्णय घेतला जाईल; असे शिंदे यांनी याबाबत सांगितले. संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबर रोजी संपत आहे.