भारत पराभवाच्या छायेत

पहिल्‍या डावात २०७ धावांनी पिछाडीवर असलेल्‍या टीम इंडियाला दोन दिवस खेळून काढावे लागणार आहेत. मात्र उपहारानंतर भारताची अवस्था ५ गडी बाद ११९ अशी बिकट अवस्था झाली आहे. उपहारानंतर तासाभरातच वीरेंद्र सेहवाग, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर व युवराज सिंग असे आघाडीचे पाच फलंदाज बाद झाले आहेत.

शनिवारी सकाळी इंग्लंडचा डाव ५२३ धावावर आटोपला. सकाळच्या सत्रात केवळ १४ धावात त्यांचे चार फलंदाज बाद झाले. ओझाने चार तर अश्विनने तीन बळी मिळवले. त्‍यानंतर भारताचे सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी सावध सुरुवात केली. उपहाराला खेळ थांबला त्‍यावेळी भारताची बिनबाद ८६ अशी होती.

उपहारानंतर तासाभरातच खेळाचे चित्र पालटले. पहिल्याच चेंडूवर सेहवाग ४९ धावावर असताना ग्रॅहम स्‍वानने त्याचा त्रिफळा उडविला. सेहवागचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्‍यानंतर स्थिरावलेला चेतेश्‍वर पुजाराही एक चोरटी धाव घेण्‍याचा प्रयत्‍नात धावबाद झाला. त्यानंतर गंभीरही अतिशय बेजबादार फटका मारुन तो परतला. मॅथ्‍यू प्रायरने त्‍याचा अप्रतिम झेल घेतला. सचिन तेंडूलकर फार काळ तग धरू शकला नाही. ग्रॅहम स्‍वानच्‍या चेंडुवर स्लिपमध्‍ये झेल देऊन तो अवघ्‍या पाच धावावर बाद झाला. त्यानंतर युवराज सिंग बाद झाला. पहिल्‍या डावात २०७ धावांनी पिछाडीवर असलेल्‍या टीम इंडियाला दोन दिवस खेळून काढले तरच ही कसोटी वाचविता येणार आहे.

Leave a Comment