तिसरी कसोटी : इंग्लंडची आघाडी

गेल्या दोन दिवसापासून भारतीय गोलंदाजी इंग्लिश फलंदाजांसमोर निष्प्रभ ठरली असून त्यामुळेच इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. या मालिकेत सलग तिसरे शतक ठोकून कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने भारताला अडचणीत आणले आहे. कुक आणि जोनाथन ट्रॉट यांनी दुस-या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली. तिस-या दिवशी उपहारानंतर इंग्लंडने पहिल्या डावात १ बाद ३३४ धावा करून पहिल्या डावात १८ धावाची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या केल्या होत्या.

कालच्या १ बाद २१६ वरून पुढे इंग्लंडने शुक्रवारी खेळ पुढे सुरु केला. यावेळी कुक १३६ तर ट्रॉट २१ धावा काढून नाबाद होता. इंग्लंडने तिस-या दिवशी आत्मविश्वासाने फलंदाजी केली. कुकने ईडनवर चोफेर फटकेबाजी करताना भारतीय गोलंदाजीची धुलाई केली. त्याने दोन षटकार आणि २३ चौकारांच्या मदतीने नाबाद १८७ धावा ठोकल्या. तर ट्रॉट ८७ धावा काढून नाबाद होता. भारतीय गोलंदाजाला आज तीन तासाच्या खेळात एकही फलंदाजाला बाद करता आले नाही.

भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांसमोर मात्र नागी टाकली आहे. गोलंदाजांची देहबोली सुद्धा निराशाजनक होती. इंग्लंडचं गोलंदाजांनी १० फलंदाज बाद केले मात्र भारतीय गोलंदाजांनी दोन दिवसात एकच विकेट गेह्तली आहे. त्यांच्याकडे कसलीच खुन्नस दिसली नाही. केवळ ओझाने एक विकेट घेतली आहे. जहीर खान, ईशांत शर्मा, रविचंद्रन आश्विन यांची गोलंदाजी मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे.

Leave a Comment