अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची महागडी निवडणूक

वॉशिग्टन दि.७ -अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या या वर्षात पार पडलेल्या निवडणूकात प्रचाराच्या खर्चाने २ अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडून विक्रम रचला आहे असे सरकारला नुकत्याच सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रचार खर्चाचे हिशेब गुरूवारी सादर करण्यात आले.

या हिशोबांनुसार रिपब्लीकन पार्टीचे उमेदवार मिट रोमनी यांच्या फंड रेझिंगपोटी ८६ दशलक्ष डॉलर्स खर्ची पडले आहेत. निवडणुकांच्या अंतिम आठवड्यात हा खर्चाचा आकडा २ अब्ज डॉलर्सहून अधिक झाला आहे. त्यात प्रसारमाध्यमातून करण्यात आलेल्या जाहिरातींवरील खर्च मुख्य असून या खर्चानेही नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. सुपर पोलिटिकल अॅक्शन कमिटीने दिलेल्या देणग्या ९५ दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहेत. त्यात लास वेगास कॅसिनोचे मालक शेल्डन अॅडेलसन आणि त्यांच्या पत्नीने रिपब्लीकन पक्षासाठी एकदा २३ दशलक्ष व दुसर्यांडदा १० दशलक्ष डॉलर्स दिले आहेत असेही दिसून आले आहे.

Leave a Comment