
अॅपलने गेल्याच आठवड्यात भारतात आय ट्यून्स म्युझिक स्टोअर सुरू केल्यानंतर आता त्यांचा आयपॅड मिनीही भारतात दाखल झाला असून त्याची विक्री आजपासून म्हणजे शुक्रवारपासून सुरू झाली आहे. आयपॅड मिनीसोबतच अॅपल टिव्ही, फोर्थ जनरेशन आय पॅड, फिफ्थ जनरेशन आयपॉड व टच आयफोनही विक्रीसाठी भारतात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.