केट विल्यम्स अपत्याच्या नावांवरून जोरदार बेटींग

लंडन दि. ६ – युवराज विल्यम्स आणि युवराज्ञी केट यांना अपत्य होणार असल्याचे गुपित उघड झाल्यापासून ब्रिटनमध्ये या अपत्याचे नाव काय ठेवले जाईल यावरून बेटींग घेतले जाऊ लागले आहे. मुलगी असेल तर एलिझाबेथ, व्हिक्टोरिंया, डायना या नावाना सर्वाधिक पसंती दिली जात असून त्यासाठी ८ ला १ असा दर घेतला जात आहे. मुलगा असेल तर फ्रन्सिस, जॉन, चार्लस या नावांसाठी १० ला १ असा दर निघाला आहे. तर राजघराण्यातील पारंपारिक नांवे अॅन, फिलिप, एडवर्ड यांच्यासाठी १२ ला १ असा दर काढला गेला आहे.

बेटींग घेणार्याक लँडब्रुकच्या जेसिका ब्रिज हिच्या मते येणारे अपत्य मुलगी असेल तर एलिझाबेथ इतके दुसरे चांगले नांव असू शकत नाही. तर पॅडी पॉवर या प्रतिस्पर्धी बेटींग कंपनीने व्हिक्टोरिया, मेरी या नावांवर बेटींग घेतले असून त्यासाठीही ८ ला १ असा दर काढला आहे. अपत्याच्या केसाचा रंग कोणता असेल यावरही बेटींग सुरू असल्याचे समजते.

वास्तविक केट आणि विल्यम्स यांनी ही गोड बातमी ख्रिसमसच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचे ठरविले होते पण केटला रूग्णालयात हलवावे लागल्याने ती बातमी अगोदरच जाहीर झाली. विशेष म्हणजे केट ला जुळे होण्याची शक्यता डॉक्टर्स वर्तवित आहेत कारण सध्याची तिची सर्व लक्षणे जुळ्याचीच दिसत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment