’एफडीआय’च्या निर्णयाला लोकसभेत मंजूरी

नवी दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय)
नवी दि‘ी- लोकसभेमध्ये रिटेल क्षेत्रात 51 टक्के एङ्गडीआयच्या निर्णयाला मतदानानंतर मंजुरी मिळाली. सरकारच्या बाजुने 253 मते पडली, तर विरोधात 218 मते पडली. एकूण 471 जणांनी मतदान केले. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी नियम 184 अंतर्गत मांडलेला प्रस्ताव ङ्गेटाळण्यात आला.

दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर रिटेल क्षेत्रात 51 टक्के एङ्गडीआयच्या ऐतिहासिक निर्णयावर लोकसभेत मतदान झाले. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी सर्वप्रथम आवाजी मतदान घेतले. आवाजी मतदानाने एङ्गडीआयच्या निर्णयाच्या बाजूने निर्णय आला. त्यानंतर विरोधकांनी प्रत्यक्ष मतदान घेण्याची मागणी केली. त्यातही विरोधकांचा पराभव झाला.
’ङ्गेमा’मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्तावही लोकसभेत मतदानानंतर नामंजुर झाला. प्रस्तावाच्या बाजुने 224 तर विरोधात 254 मते पडली. एकूण 478 जणांनी मत नोंदविले.
रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नसून, यासंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये हालचाली झाल्या आहेत. स्वत: भाजपने 2002 मध्ये एङ्गडीआयला समर्थन होते. त्यामुळे भाजपचा आता कशासाठी विरोध आहे, असा सवाल वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केला. कालपासून लोकसभेमध्ये एङ्गडीआयच्या निर्णयावर चर्चा सुरु आहे. त्या चर्चेला सरकारच्या वतीने आनंद शर्मा यांनी लोकसभेत उत्तर दिले. शर्मा यांच्या उत्तरानंतर लोकसभेत मतदान झाले.

आनंद शर्मा यांचे निवेदन सुरु असताना बसपच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यानंतर काही वेळात समाजवादी पार्टीच्या सदस्यांनीही सभात्याग केला. बसपचे 21 तर सपाचे 22 सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिले. मायावतींनी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु, मतदानाबाबत भूमिका गुलदस्त्यातच ठेवली. सभात्याग केल्याने सरकारला एक प्रकारे दोन्ही पक्षांनी ङ्गायदाच करुन दिला आहे.

शर्मा म्हणाले, एङ्गडीआयचा शेतक-यांना ङ्गायदाच होणार आहे. सर्वांशी याबाबत चर्चा करण्यात आली होती. ममता बॅनर्जी तसेच नितीश कुमार यांच्याशीही चर्चा करण्यात आली. 7 राज्यांचा एङ्गडीआयला विरोध आहे. तर 11 राज्यांनी एङ्गडीआयला समर्थन दिले. देशात हल्दीराम आणि बिकानेरवाला यांच्या उद्योगांचे उदाहरणही शर्मा यांनी दिले. त्यांची भरभराट झाली. त्यानंतर त्यातून रोजगारही मिळाला तसेच शेतक-यांनाही ङ्गायदा झाला, असे शर्मा म्हणाले.
(
तुमच्यापेक्षा जास्त गुंडगिरी करतो मी : लालू यादव
नवी दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय)
लोकसभेत सुरु असलेल्या रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीच्या चर्चेत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा संयम सुटला आणि ते एका सदस्यावर अक्षरश: डाङ्गरले. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ सुरु झाला. यादव यांनी त्यांचे वाक्य मागे घेतल्यानंतरच हा गोंधळ शांत झाला.
यादव बोलण्यासाठी उभे राहताक्षणी एका सदस्याने हे सरकारशी मिळालेले असल्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर यादव यांचा संयम सुटला आणि त्यांनी त्या सदस्याला तुमच्या पेक्षा जास्त गुंडगिरी मी करतो, असे सुनावत, तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करायचे का ? असा सवाल लालूप्रसादांनी उपस्थित केला. लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांच्या अनुपस्थित काम पाहणारे करिया मुंडा यांनीही त्या सदस्याला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर ब-याच वेळाने गोंधळ थांबला. यादव यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या पहिल्याच वाक्यावर पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला. संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तरीही गोंधळ थांबला नाही. शेवटी सदनाची कार्यवाही स्थगित करावी लागली.
पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर यादव यांनी, एङ्गडीआयच्या बाजूने बोलताना भाजप देशाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले. 2002 मध्ये 100 टक्के एङ्गडीआयचा निर्णय भाजपप्रणित एनडीएने घेतला होता, असा खुलासा करत आताच विरोध का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परकीय गुंतवणूक झाली तर, शेतक-यांचा आणि पर्यायाने देशाचा ङ्गायदा होणार आहे. बेरोजगारांना काम मिळेल असे सांगत, जर त्यात काही गडबड झाली तर त्यांच्या दुकानांना आग लावण्यासही कमी करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

गुजरात निवडणूक : नरेंद्र मोदींनी पाडले कॉंग्रेसला खिंडार
गांधीनगर,5 डिसेंबर (पीएसआय)
गुजरात निवडणूक जवळ येत असतानाच मोदींनी कॉंग्रेसला खिंडार पाडण्याला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगच लावली आहे.
मंगळवारी सुरतचे विद्यमान आमदार आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुंवरजी हलपति यांनी मु‘यमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला.
कुंवरजींनी मोदींच्या पाया पडत भगवा रुमाल खांद्यावर घेतला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरात युवक कॉंग्रेसचे निलेश लुहार, सुरत जिल्हा उपाध्यक्ष मनोजभाई पटेल, जिल्हा मंत्री प्रभुभाई पटेल यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोदींनीही या कार्यकर्त्यांचे उस्ङ्गूर्त स्वागत केले. भाषणात त्यांनी कुंवरजी यांचे कौतूकही केले.
सध्या गुजरात कॉंग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. हिच वेळ साधत भाजपने कॉंग्रेसच्या असंतुष्टांना पक्षात स्थान देऊन कॉंग्रेसलाच आव्हान दिले आहे. कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना भाजप आपल्या तिकीटावर मैदानात उतरवत आहे.

देशाच्या किनारपट्टी सुरक्षेच्या विविध उपाय योजना
दि‘ी,5 डिसेंबर (पीएसआय)
देशातील सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मरीन पोलिस या तीन दलांतर्ङ्गे सुरक्षा कवच सातत्याने पुरविण्यात येत आहे. सतत लक्ष देण्याची यंत्रणा सुधारण्यात आली आहे. तसेच टेहाळणी वाढविणे यासाठी तीनही दले, कस्टम खाते, राज्यशासन यांच्यातर्ङ्गे एकत्रितपणे कार्य केले जाते. संयुक्त कार्याची केंद्रे स्थापन करुन त्यातून गुप्तचर यंत्रणा सुरळीत करण्यात येत आहे. संपूर्ण किनारे व बेटे यांना व्यापणारी रडार यंत्रणा स्थापन करण्यात येत आहे.
संरक्षण मंत्री श्री. ए.के. ऍटनी यांनी राज्यसभेत श्री. महमद अली खान व श्रीमती रत्ना बैन यांना दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

5 पीएसआय 80
(राष्ट्रीय)
मागील 50 वर्षात दोन तृतियांश अङ्गि‘कन वाघ लुप्त
वॉशिंग्टन,5 डिसेंबर (पीएसआय)
अङ्गि‘केत मागील 50 वर्षात सवाना किंवा गवताचे मैदान 75 टक्क्यापर्यंत घटले असून दुसरीकडे दोन तृतियांशपेक्षा जास्त वाघ जास्त लुप्त झाले आहेत. ही माहिती एक अमेरिकी अध्ययनात देण्यात आली आहे.
ड्यूक विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वात झालेल्या अध्ययनाच्या अंदाजानुसार सवानामध्ये राहणार्‍या वाघांची सं‘या आता 32,000 पेक्षा कमी झाली आहे. 1960 मध्ये ही सं‘या एक लाखाच्या जवळपास होती.
’बायोडायवर्सिटी ऍण्ड कंजर्वेशन’ या विज्ञान साप्ताहिकाने आपल्या लेखात म्हटले की, ड्यूक निकोल्स स्कूल ऑङ्ग एनवायरमेंटमध्ये संरक्षण पारिस्थितीचे प्रा. स्टुअर्ट पिम यांनी सांगितले, सवानाचा अर्थ विशाल उघड्या मैदानात वन्यजीवाच्या सं‘येशी निगडीत आहे.
विद्यापिठाच्या वक्तव्यानुसार अध्ययनाचे सहलेखक स्टुअर्ट म्हणाले, परंतु वास्तविकता अशी आहे की, या विशाल भूमीच्या उपयोगाचा उद्देश्य बदलला आहे आणि गतीने वाढणार्‍या लोकसं‘येमुळे जंगलतोड होत आहे. यामुळे मुळ सवाना तुकड्यात विभागाला जात आहे.
अध्ययनाचे सह-लेखक व पिमचे माजी पदव्युतर विद्यार्थी ल्यूक डॉलर म्हणाले , अंदाजित 32,000 ते 35,000 वाघांपैकी 5000 पेक्षा जास्त वाघ लहान व एकांत ठिकाणी राहतात आणि त्यांचे अस्तित्व संकटात आहे. या संशोधनाने त्या क्षेत्राची ओळख करण्यात मदत मिळेल जेथे आम्ही काही वेगळे करू शकतो.

Leave a Comment