भारताची सावध सुरुवात

कोलकात्यातील तिस-या कसोटी सामान्यत सावध सुरुवात केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिस-या कसोटी सामान्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने ४७ षटकात ३ बाद १३२ धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर २६ व विराट कोहली २ धावांवर खेळत होते.

भारताची सुरुवात गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. मात्र, गंभीरच्या चुकीमुळे सेहवाग २३ धावांवर रन ओउट झाला. त्याने २६ चेंडूत तीन चौकारासह २३ धावा केल्या होत्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आज फार काळ खेळू शकला नाही. यावेळी मॉन्टी पानेसरने त्याला बोल्ड केले. त्याने १६ धावा केल्या होत्या. त्याने ४८ चेंडूत दोन चौकारासह १६ धावा केल्या.

या सामन्यात दमदार फलंदाजी करीत गौतम गंभीरने अर्धशतक ठोकले. त्याने सेहवागबरोबर ४७ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने ८४ चेंडूत १० चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. उपहारापर्यंत भारताने २९ षटकात २ बाद ९० केल्या होत्या. मात्र, उपहारानंतर अवघ्या १० धावा काढून ६० धावावर गंभीर मॉन्टी पानेसरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

Leave a Comment