नृत्य दिग्दर्शक फराह खान ‘दबंग-२’ सिनेमातील ‘फेविकोल से’ या गाण्याला मिळालेल्या रिसपोंसमुळे खूपच उत्साहित आहे. फराह खान तसे पहिले तर वर्षामध्ये एखादे दुसरेच गाणे करते. त्या गाण्यावरच तिने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेले होते. गेल्या काही दिवसापासून मिळत असलेल्या प्रतिक्रीयामुळे ती आनंदित आहे.
नुकतीच ती एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलताना फराह म्हणाली, ‘ मी या गाण्यावर खूपच खुश आहे. गेल्यावर्षी ‘दबंग’ सिनेमासाठी ‘मुन्नी बदनाम’ हे गाणे मी निवडले होते. मात्र यावेळेस अरबाज खानने माझ्यासाठी ‘फेविकोल से’ गाने शोधले होते. या गाण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. तसे पहिले तर करीनाने त्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. ती या सिनेमात केवळ हे आयटम सॉंग करीत आहे. हे गाणे सर्व कुटुंब एकत्रित मिळून पाहन्यासारखे आहे.’
‘मुन्नी’ आणि ‘फेविकोल’ या दोन गाण्यापैकी कोणते एक गाणे आवडेल असे फराहला विचारले असता, ती म्हणाली, ‘माझ्या मुली दिवा आणि आन्या यापैकी एकची निवड केल्यासारखे होईल.’ अरबाज खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘दबंग-२’ हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे.