घाईगर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीत सापडणार्या ची काय अवस्था असते याचा अनुभव बहुतेकजणांनी कधी ना कधी घेतलेला असतो. मात्र अमेरिकेतील लॅरी नील यांनी यावरचा तोडगा शोधला असून त्यांने आकाशात झेप घेऊन मोकळा रस्ता मिळेपर्यंत उड्डाण करू शकणारी मोटर ट्रायसिकल तयार केली असून स्काय सायकल असे त्याचे नामकरण केले आहे.
या मोटरला ५८२ सीसीचे इंजिन असून ६८ इंचांची तीन पाती आहेत. ही मोटर आकाशात प्रतितास ५६ किमी वेगाने उडते आणि २० फुटी जागेत उतरविता येते. जमिनीवर या गाडीचा वेग १०४ किमी आहे. मात्र ही मोटर वापरताना तुम्हाला उड्डाण करायची वेळ आली तर त्यासाठी पायलट परवाना आवश्यक आहे.एकदा इंधन भरून घेतले की ती पाच तास हवेत उडू शकते.या गाडीची किमत आहे ४६ हजार पौंडस.
नील यांना अेमरिकेने या वाहनाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना विकण्यासाठी पेटंट दिले असून त्याला राष्ट्रीय तसेच आंतर राष्ट्रीय कंपन्यांकडून ऑर्डर्सही मिळत आहेत. नील यांचे या गाडीसाठी अनेक वर्षे संशोधन सुरू होते मात्र गाडी जमिनीवर आल्यानंतर तीन पात्यांचे काय करायचे याचे उत्तर त्यांना मिळत नव्हते. मात्र आता हे उत्तर मिळाले असून त्यांनी ही पाती घडी होऊ शकतील अशी बनविली आहेत. टेक्सास बॉर्डर पेट्रोलकडून नील यांना या गाडीसाठी मोठी ऑर्डर मिळाली असल्याचेही समजते.