मोदींना अमेरिकेचा व्हीसा नकोच

वॉशिग्टन दि. ४ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा व्हीसा दिला जाऊ नये अशी विनंती करणारे २५ अमेरिकेन लॉ मेकरच्या सह्या असलेले पत्र अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी हिलरी क्लींटन यांना देण्यात आले आहे. २००२ सालात गुजराथेत उसळेल्या दंगलीत बळी गेलेल्यांना पुरेसा न्याय मिळालेला नाही हे कारण त्यासाठी देण्यात आले असल्याचे समजते. हे पत्र नोव्हेंबर २९ रोजीच किलंटन यांना दिले गेले होते मात्र ते काल पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला गुजराथ दंगलीत बळी गेलेल्यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

हे पत्र देण्यात सहभागी असलेले फ्रॅक कुल्फ म्हणाले की मोदी आता पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. मात्र २००२ सालच्या दंगलीत ज्यांचे बळी गेले त्यांना पुरेसा न्याय अद्यापीही मिळालेला नाही अशी अमेरिकन लॉ मेकरची भावना आहे. या दंगलीच्या पुढच्या तपासात मोदी सरकार अडचणी आणण्याची शक्यता आहे इतकेच काय पण त्यामुळे न्यायदानावरही परिणाम शक्य आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केल्याने ते जगमान्यता मिळविण्यासाठी परदेश दौरे करतील तेव्हा अमेरिकेतही येतील आणि त्यासाठी व्हिसा अर्ज करतील मात्र त्यांना व्हिसा दिला जाऊ नये. तो दिला गेला तर मोदी अधिक आक्रमक पवित्रा घेतील आणि दंगल पिडीतांना न्याय मिळणे आणखी दुरापास्त होईल असे आमचे मत आहे.

Leave a Comment