इडन गार्डनच्या खेळपट्टी बाबत सस्पेंस

कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. फिरकिला साथ देणारी खेळपट्टी तयार करावी अशा सूचना कर्णधार धोनीने केली होती. मात्र त्यानंतर बराच वाद झाला. त्यानंतर इडन गार्डनची खेळपट्टी क्युरेटर मुखर्जी याने कशी तयार केली याबाबत मात्र अजूनही सस्पेंस कायम आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर पाहिल्यादा फलंदाजी घ्यावायची का गोलदाजी यावरून भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी संभ्रमात आहे.

मुंबई कसोटी सामन्यात भरताचा दारूण पराभव झाल्याने टीम इंडिया गेल्या काही दिवसापासून चिंतेत आहे. त्यामुळेच धोनीने फिरकी घेणारी खेळपट्टी हवी असल्याचे मनी केली होती. मात्र क्यूरेटर प्रबीर मुखर्जी यांनी त्यास विरोध केला होता. त्यानंतर बीसीसीआयने मुखर्जींच्या जागी आशीष भौमिक यांची निवड केली होती. याचा राग आल्याने मुखर्जीं वैद्यकीय रजेवर निघून गेले होते. मात्र, त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने मुखर्जी यांना विनंती करून बोलावून आणले. ही खेळपट्टी मुखर्जी यांनी बनविली आहे. त्यानंतर याबाबत त्याने काहीच सांगितले नाही. ही खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज बांधणे धोनीला कतीन जात आहे.

तिस-या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल यावरुन अजूनही भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी संभ्रमात आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांबरोबरच वेगवान गोलंदाजांनाही मदतगार ठरणारी तयार केली असल्याचा अंदाज काही प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनि व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतासोबत इंग्लंडचा संघ सुद्धा खेळपट्टीवरून बुचकळ्यात पडला आहे.

Leave a Comment