सर्च इंजिन गुगल करतेय सर्च

सिगापूर दि.३ – जगभरातील नंबर एकचे सर्च इंजिन असलेल्या गुगलने आता स्वतःच सर्च सुरू केला आहे. हा सर्च आहे नॉन इंग्लिश युजर शोधण्याचा. हे एक प्रकारचे सर्वेक्षणच असून त्याद्वारे गुगल भविष्यात आणखी ३०० कोटी युजर पर्यंत त्यांचे उत्पादन पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. गतवर्षी जगभरात २२० कोटी लोकांना इंटरनेट अॅक्सेस उपलब्ध करून देण्यात आले असून अद्यापीही ४६० कोटी जनता इंटरनेटपासून दूर आहे आणि विशेष म्हणजे यातील निम्मी लोकसंख्या चीन, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगला देशात आहे.

जगात इंटरनेट वापरणार्याोत इंग्लीश बोलणारी लोकसंख्या अधिक आहे. मात्र त्यामुळे नॉन इंग्लीश युजर इंटरनेटपासून कांहीसे दुरावले गेले आहेत. हे संख्येने प्रचंड असलेले नॉन इंग्लीश युजर ऑनलाईन आणण्याचा गुगलचा प्रयत्न असून त्यात भारत फार महत्त्वाचा ठरू शकतो असे दक्षिण पूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्युलियन पर्सोद यांचे म्हणणे आहे.

पार्सोद यांच्या मते विकसनशील देशात ३३० कोटी नागरिक आहेत मात्र सध्या त्यातील फत्त* ४७.५० कोटी नागरिकाना इंटरनेट अॅक्सेस आहे. त्यामुळे विकसनशील देशात गुगलच्या वाढीला मोठी संधी आहे. परिणामी सध्या कंपनीने फ्री झोन आणि गुगल ट्रेडर या दोन योजना आणल्या असून त्यात युजरला मोफत इंटरनेट वापरता येणार आहे तर व्यापार्यांोसाठी मोफत वेबसाईट मिळू शकणार आहे. यामुळे आगामी तीन वर्षात आणखी ५० कोटी युजरना इंटरनेट अॅक्सेस उपलब्ध होऊ शकेल. तुलनेते युएस मध्ये दीड कोटी युजरची भर पडणार आहे असेही त्यांच म्हणणे आहे.

Leave a Comment