बांग्ला देश -भारत वस्त्रोद्योगात सहकार्य

ढाका दि. ४ – बांगला देशाचा स्वातंत्रदिन ३ डिसेंबरला साजरा करण्यात आला असून त्यानिमित्ताने तेथे इंडिया शोचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारत आणि बांगला देशातील व्यावसायिक उद्योजक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून या दोन देशांत विविध क्षेत्रात व्यावसायिक संबंध दृढ करण्याबाबतचा विचार मांडला गेला. या दोन्ही दीर्घकाळ मैत्रीचे संबंध टिकावेत आणि त्याचबरोबर व्यावसायिक सहकार्य करारही व्हावेत अशी अपेक्षा यावेळी कार्पोरेट प्रतिनिधींनी व्यक्त केली.

बांगला देश आणि भारतातील व्यावसायिक संबंधांची सुरवात टेक्स्टाईल पासून करण्याचे संकेत यावेळी दिले गेले. फिक्कीतील राष्ट्रीय समितीचे सदस्य व टीटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय जैन यासंबंधात माहिती देताना म्हणाले की भारत टेक्स्टाईल आणि फॅब्रिक मध्ये अग्रणी आहे तर बांगला देशात गारमेंट आणि त्यातही रेडिमेड गार्मेंटचा व्यवसाय खूपच पुढारलेला आहे. हे दोन्ही व्यवसाय परस्परपूरक असून दोन्ही देशांनी सहकार्यातून काम केले तर चीनला चांगली स्पर्धा निर्माण होऊ शकते. भारतातून गार्मेंटची १३ ते १४ अब्ज डॉलर्सची निर्यात होते तर बांगला देशातून रेडिमेड गार्मेंटची निर्यात २० अब्ज डॉलर्सची आहे. बांगला देशात भारतातून निर्यात होणारे टेक्स्टाईल व तेथील रेडिमेड गार्मेंट यांच्या सहकार्यातून या क्षेत्रात मोठी क्रांती घडविता येईल व त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

Leave a Comment