सॅमसंगचे ५० टक्के बाजारपेठेचे उदिष्ट्य

कोरियन इलेक्टॉनिकस कंपनी सॅमसंग ने त्यांचा मोबाईल बाजारातील शेअर ५० टक्क्यांवर नेण्याचे उदिष्ट्य ठेवले असल्याचे कंपनी उपाध्यक्ष असीम वारसी यांनी सांगितले. कोलकाता  शहरातील पहिल्या सॅमसंग ब्रँडेड स्टोअरचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

यावेळी वारसी म्हणाले की देशात सध्या मोबाईल मार्केटची वाढ वर्षाला १० टक्के इतकी आहे. सॅमसंगचा सध्याचा या क्षेत्रातील वाटा ४० टक्के असून पुढील वर्षापर्यंत तो ५० टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न आहेत. अर्थात या वाढीत स्मार्टफोनचा हातभार मोठा असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की भारतात स्मार्टफोन क्षेत्रात कंपनीचा वाटा ४८ टक्क्यांवर पोहोचला असून पुढील वर्षात तो ६० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा इरादा आहे. सध्या देशात स्मार्टफोनची १ कोटी ८० लाख युनिट विकली गेली आहेत.

स्मार्टफोनची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढते आहे . मात्र स्मार्टफोनची विक्री वाढली तरी फिचर फोन बाजारात राहणार आहेतच कारण त्यांचेही बाजारात एक स्थान आहे. देशातील सर्वाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे म्हणून सॅमसंग देशात पुढच्या वर्षापर्यंत आणखी वीस आऊटलेट सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.