मतदान जागृतीसाठी सायना आणि मेरी करारबद्ध

नवी दिल्ली: मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑलिंपिक पदक विजेती बेडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि मुष्टियुद्ध खेळाडू मेरी कोम यांना करारबद्ध केले आहे. महिला खेळाडूना करारबद्ध करण्याची ही पहिलीच वेळ असून त्या अधिक प्रभावीपणे युवक आणि महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करू शकतील; असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

यापूर्वी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी मतदान विषयक जाणीव जागृतीचे काम केले आहे. मेरी कोम आणि सायना यांना करारबद्ध केल्यावर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये दृकश्राव्य संदेश रेकॉर्ड करण्यात आल्या असून गुजरात येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संदेश गुजरात येथे रवाना करण्यात आले आहेत.

Leave a Comment