बेनझीर आणि इम्रानचे होते प्रेमप्रकरण

ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना पाकिस्तानच्या हत्या झालेल्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकारणात सक्रिय असलेला इम्रानखान यांचे अफेअर होते आणि त्यांच्या या संबंधांनी फारच जवळची पातळी गाठली होती असा दावा इम्रानचे नव्याने आत्मचरित्र लिहिणार्याफ मान्यताप्राप्त लेखक ख्रिस्तोफर सँडफोर्ड यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या राजकारणात इम्रान उतरल्यापासून बेनझीर आणि तो सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आले आहेत. राजकारणात ते एकमेकांचे कट्टर विरोधक होते इतकेच नव्हे तर बेनझीर यांची हत्या होण्यापूर्वी इम्रानखानने त्यांच्यावर घणाघाती टीका करून अनेक आरोप केले होते. मात्र विद्यार्थी दशेत ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्यांच्या प्रेमाने बरीच पुढची पातळी गाठली होती असे ख्रिस्तोफर यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर इम्रानच्या आईने या दोघांचे अरेंज्ड मॅरेज जुळविण्याचाही प्रयत्न केला होता असेही ख्रिस्तोफर यांचे म्हणणे आहे. आपल्या विधानांना पुष्टी देणार्याा अनेक बाबी त्यांनी लोकांसमोर आणल्या असल्याचे समजते.

Leave a Comment