कंगनाने नाकरली एक कोटीची ऑफर

आता काही दिवसातच नवीन वर्ष येणार असून त्याची तयारी आता जोरात सुरु आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धूम माजविणारे इवेंट्स प्लान केले जात आहेत. नवीन वर्षाच्या स्वगतासाठी पाच सितारा होटलमध्ये परफॉर्म करण्यसाठी कंगनापुढे एक कोटीची ऑफर ठेवण्यात आली होती. मात्र ही ऑफर कंगनाने नाकारली आहे.

गेल्या काही दिवसापासून कंगना राणावत कामात खूपच बीजी आहे. तिच्याकडे सध्या पाच सिनेमे आहेत. त्यामुळे सध्या या सिनेमाच्या शूट मध्ये ती बीजी आहे. त्यामुळे तिच्याकडे सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफॉर्म करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे तिने एक कोटी रुपयाची ऑफर नाकारली असल्याचे समजते.

बॉलीवुडमधील स्टार हिरोइन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफॉर्म करतात. त्यांच्यासाठी फाइव स्टार होटल्समध्ये परफॉर्म करणे ही काही आता नवीन बाब नाही. अभिनेत्री बिपाशा बसुने अशा प्रकारचे परफॉर्म सादर करून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. यापूर्वी कंगनाने सुद्धा काही कार्यक्रमात परफॉर्म केला आहे. त्यामुळे तिच्यापुढे ही ऑफर ठेवली होती मात्र तिने नकार दर्शविला आहे.