पराभव पचवणे कठीण-सायना नेहवाल

‘आगामी काळात चीनमध्ये होत असलेली स्पर्धा जिंकणे हे माझे ध्येय आहे. स्पर्धा जिंकणे हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे. मला पराभव पचवणे कठीण जाते. पराभवाचा सर्व राग मी विनाकारण कोच आणि घरच्या मंडळीवर काढत असते. एकादा सामना हरल्यानंतर मला काहीचा चांगले वाटत नाही. त्यामुळे मी खूप निराश होते. पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला खूप वेळ लागतो,’ असे मत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने व्यक्त केले.

पुढे बोलताना सायना म्हणाली, ‘ जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू होण्याचे आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाही. आगामी काळात तीन ते चार सुपर सिरीज जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. त्यामुळे मी स्पर्धा जिंकन्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मी सध्या कसून सर्व करीत आहे.’

गेल्या काही दिवसापुर्वी मला दुखापत झाली होती. त्यामधून मी आणखीन पूर्णपणे फिट झाले नाही. हाँगकाँग व डेन्मार्क ओपनमध्ये मी गुडघ्याला पट्टी बांधून खेळले होते. दुखापतीनंतर पुनरागमन करणे सर्वसाठी कठीण असते. हा एक खेळाचाच भाग आहे. लंडन येथील ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी मला ताप आला होता. मात्र, घरच्यांनी मनोबल वाढवल्याने मी ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी गेले आणि मला त्यठिकाणी कांस्यपदक जिंकता आले असल्याचे सायनाने सांगितले.

Leave a Comment