विरासत माझा मुलगाच सांभाळणार- सलमान

बॉलिवूडचा टायगर असलेला सलमान खान प्रत्येक ठिकाणी दबंगगिरी दाखवत असतो. लग्न कधी करणार याबाबत कोण जर त्याला प्रश्न विचारत असेल तर त्याला फिरवण्याचे कसब त्याच्याकडे आहे. त्यामुळेच त्याला आगामी काळात तुझी विरासत कोण सांभाळणार या प्रश्नाचे उत्तर त्याने माझा मुलगाच सांभाळणार असे दिले. लग्न केंव्हा करणार याचे उत्तर देणे मात्र टाळले.

येत्या काळात त्याचा व सोनाक्षी सिन्हा हिचा ‘दबंग-२’ हा सिनेमा येत आहे. याबाबत बोलताना सलमान म्हणाला, ‘दबंग सिनेमाचा शेवट सर्व बाबी चांगल्या असताना झाला होता. त्यामुळेच ‘दबंग-२’ ची सुरुवात आमच्यासाठी आव्हानातमक होती. ‘दबंग’ वन मध्ये काही अडवांटेज होते. त्यामुळे पुढे चालुन काही तरी निर्मिती करण्यासाठी स्कोप होता. दूस-या पार्टमध्ये हीरो-हिरोइन लग्न झाले असून हिरोइन प्रेगनेंट असल्याचे दाखण्यात आले आहे. त्याशिवाय विलनचा रोल क्रिएट केला आहे. स्क्रिप्ट लेवलपण चैलेंजिंग होते तरीपण संपूर्ण टीमने त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.’

‘दबंग-३’ ची स्क्रिप्ट ७० पर्सेंट तयार आहे, मात्र हा ‘दबंग’ चा सीक्वल नसून प्रीक्वल असणार आहे. त्यामध्ये चुलबुल कसा मोठा झाला. पोलीसवाला कसा बनला हे दाखविण्यात येणार असल्याचे सलमानने स्पष्ट केले. आगामी काळात तुझी विरासत कोण सांभाळणार या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘ ही विरसात माझा मुलगाच सांभाळणार असून अरहान, निर्वाण आणि युवान हे सुद्धा मला मुलासारखेच आहेत. हे सांगत असताना लग्न केंव्हा करणार याचे उत्तर देणे मात्र टाळले.’

Leave a Comment