मुलायमसिंह आता विरोधकांच्या गोटात

नवी दिल्ली: नवी दिल्ली: सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर संसदेचे कामकाज सुरळीत झाले आहे. मात्र सरकारला बाहेरून पाठींबा देणाऱ्या समाजवादी पक्षाने सरकारविरोधात मतदान करण्याची भूमिका घेतल्याने सरकार मतदानाच्या वेळी राज्यसभेत तांत्रिक दृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमने संपुआ सरकारला पाठींबा घोषित केल्याने संपुआच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.

थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेनंतर मतदान घेण्याबाबत भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आग्रही; तर सत्ताधारी आघाडी मतदानाची आवश्यकता नसल्याचे ठाम प्रतिपादन करीत होती. त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चार दिवस ठप्प झाले.

संसदीय कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी मतदानाला सामोरे जाण्याचा निर्णय संपुआने घेतला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांनी सरकारला बाहेरून पाठींबा दिला आहे. द्रमुकनेही आवश्यकता पडल्यास जातीय शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करण्याची ग्वाही या बैठकीत दिली. त्यामुळे मतदानाला सामोरे जाण्यास संपुआ आत्मविश्वासाने सज्ज झाली आहे. मात्र मुलायम सिंग यांच्या राजकीय विरोधक बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी सरकारची पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुलायम यांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार्ची खुर्ची धोक्यात नसली तरीही राज्यसभेत सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन सरकारने राजीनामा देण्याची मागणी विरोधक करू शकतात.

Leave a Comment