जानेवारीत हेडलीला सुनावली जाणार शिक्षा

मुंबईवर झालेला २६ नोव्हेंबर २००८ चा दहशतवादी हल्ला आणि डेन्मार्क वर्तमानपत्रावरचा नियाजित हल्ला यात दोषी ठरविलेल्या डेव्हीड हेडली आणि त्याचा साथीदार तवन्नूर राणा यांना शिकागो कोर्टाचे न्यायाधीश हॅरी लेनिनवेअर अनुक्रमे १७ व १५ जानेवारीला शिक्षा सुनावणार आहेत असे शिकागो न्यायालयाचे प्रवक्ते रँडेल सम्बर्न यांनी जाहीर केले आहे.

जन्माने अमेरिकन असलेला हेडली दहशतवादी संघटना लष्करे तैयब्बाचा कार्यकर्ता असून मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्याचा कट त्याने रचल्याचा आरोप होता. राणावरही मुंबई हल्ला आणि डेन्मार्क वर्तमानपत्रावरचा हल्ला रचल्याचा आरोप होता. एफबीआयने हेडलीवर मुंबइ हल्ला, लष्करेला पुरविलेली मदत, मुंबई हल्लयात ६ अमेरिकन नागरिकांचा गेलेला बळी असे जे आरोप ठेवले होते त्या सर्व आरोपात हेडलीला दोषी ठरविले गेले आहे. वास्तविक या आरोपांवरून त्याला फाशीची शिक्षा होऊ शकली असती पण त्याने एफबीआयशी दहशतवादी संघटनांबाबत माहिती देण्यास एफबीआयला सहकार्य करण्याची तयारी दाखविल्याने त्याला फाशी न देण्याचा सौदा करण्यात आला होता असेही समजते. त्याच्या शिक्षेच्या निकालाचे वाचन १७ जानेवारीला सकाळी ९ वा.१५ मिनिटांपासून सुरू होणार आहे.

राणाला कोपनहेगन येथील वर्तमानपत्रावरील हल्ल्यासंबंधी दोषी ठरविण्यात आले असून मुंबई हल्ला प्रकरणात त्याला यापूर्वीच निर्दोष ठरविले गेले आहे. त्याला ४ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार होती पण ती तारीख पुढे ढकलण्यात आली असून ही शिक्षा आता १५ जानेवारीला सुनावली जाणार आहे.

Leave a Comment