असिनची चॉइस आहे शाहरुख खान

असिनने तिच्या कारर्कीर्दीतील पहिलाच सिनेमा असलेल्या ‘गजनी’ ला १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी केले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून ती याचा प्राउड फील करीत आहे. आगामी कळत येत असलेला तिचा प्रत्येक सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये सहभागी व्हावा असे तिला वाटते. आगामी काळात बॉलीवूडचा किंग खान असलेल्या शाहरुख खान सोबत काम करण्याची तिची मनोमन इच्छा आहे.

याबाबत अधिक बोलताना असीन म्हणाली, ‘ आगामी काळात येत असलेल्या ‘खिलाडी ७८६’ या सिनेमात मी मराठी तरुणीची भूमिका करीत आहे. हे काम करीत असताना मला लैंग्वेजची अडचण आली. मात्र मला वेगवेगळ्या लैंग्वेज शिकण्यची आवड असल्याने हे सहज शक्य झाले. या सिनेमातील कल्चर पाहून मला खूप आनंद झाला. या सिनेमात मी मिथुन दादाच्या छोट्या बहिणीचा रोल करीत आहे. ही भूमिका थोडीसी आव्हानात्मक असून हे एक रफ कैरेक्टर आहे.’

या सिनेमासाठी तुला अक्षय कुमारने मराठी भाषा शिकवली आहे असे समजले. यावर असीन म्हणाली, ‘या सगळ्या अफवा आहेत. मला तर माहितीपण नाही की अक्षयला मराठी बोलता येते का नाही. या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानतर मला समजले की अक्षयला देखील मराठी बोलता येते. यासाठी मला यूनिटची हेल्प मिळाली. सध्या मीच अक्षयला मलयालम भाषा शिकवत आहे. मी आतापर्यंत सिनेमात सलमान आणि अमीर खान सोबत काम केले असून येत्या काळात मला फक्त शाहरुख खान सोबत काम करण्याची इच्छा आहे. ती पण लवकरच पूर्ण होईल असे मला वाटते.

Leave a Comment