नवी दिल्ली: कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर जोमाने उतरलेला धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग आता छोट्या पडद्यावरही झळकणार आहे. आयुष्यातील दुर्धर प्रसंगांना हिमतीने सामोरे जाणाऱ्या व्यक्तींची प्रेरणादायक ओळख करून देणाऱ्या मालिकेचे संचालन युवी करणार आहे. ही मालिका नेशनल जिओग्राफिक वाहिनीवर दि. २४ डिसेंबर पासून सुरू होत आहे.
युवराज आता छोट्या पडद्यावर
‘द अनब्रेकेबल’ असे नाव असलेल्या या मालिकेत परिस्थितीशी सामना करणाऱ्या धैर्यशील व्यक्तींबरोबरच योगायोगाने अचानकपणे एखाद्या संकटात अथवा कठीण परिस्थितीत सापडले असताना खचून न जाता; परिस्थितीशी सुंज देऊन त्यातून सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची ओळख करून दिली जाणार आहे.