कॅमेरयाला मिळाली विक्रमी २२ लाख डॉलर्सची किमत

ऑस्ट्रीया दि. २८ – ऑस्ट्रीयातील द वेस्टलिच गॅलरीने पावलो पिकासो या जगप्रसिद्ध चित्रकाराचे फोटो ज्या कॅमेरयाने काढले गेले तो कॅमेरा लिलावात २१.९ दशलक्ष डॉलर्स इतक्या प्रचंड किमतीला विकला गेल्याचे जाहीर केले असून आजपर्यंत व्यावसायिक फोटोग्राफीसाठी कोणत्याही कॅमेऱ्याला मिळालेल्या किमतीत ही किंमत जगात सर्वाधिक असल्याचेही समजते.

डेव्हीड डग्लस डंकन या ९२ वर्षीय फोटोग्राफरचा हा कॅमेरा लायका एम थ्री डी मॉडेल आहे. डेव्हीड लाईफ या जगप्रसिद्ध मासिकासाठी फोटोग्राफर म्हणून काम करत होता आणि तो पिकासोचा जिवलग मित्र ही होता. डेव्हीड ने १९५५ सालचे मॉडेल असलेल्या या लायका कॅमेरयाने लाइफ मासिकासाठी पिकासोचे अक्षरशः हजारो फोटो काढून ते प्रसिद्ध केले होते. १९५५ सालात असे चार कॅमेरे बनविले गेले होते त्यातील हा एक. त्याचा लिलाव नुकताच करण्यात आला.

लायकाचा १९२९ सालात तयार करण्यात आलेला गोल्ड प्लेटेड कॅमेराही याच लिलावात १३ लाख डॉलर्सला विकला गेला असल्याचे आर्ट गॅलरीने जाहीर केले आहे.

Leave a Comment