वॉशिंग्टन: मंगळावर प्रचंड वादळ निर्माण झाले असून या वादळामुळे मंगळावरील वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट निर्माण झाले आहेत. या वादळामुळे मंगळावरील वातावरणात लक्षणीय बदल घडून येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासाने रवाना केलेल्या रोव्हर क्युरिऑसिटीने या वादळाची माहिती नासापर्यंत पोहोचविली आहे. हे वादळ रोव्हरपासून १ हजार ३४६ किलोमीटर दूर असूनही रोव्हर असलेल्या ठिकाणी वातावरणात काही बदल झाल्याचे नासाच्या तज्ज्ञांना आढळून आले आहे.
या पूर्वी सन १९७० मध्ये मिशन विकिंगद्वारे मंगळावरील धुळीच्या वादळाचा अभ्यास करण्यात आला होता; अशी माहिती नासाचे शास्त्रज्ञ रिक ज्युरेक यांनी दिली.