पर्वतातील मूर्तींची चोरी

केलिफोर्निया: केलिफोर्निया पर्वतावर सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वी कोरलेल्या चार मूर्ती चोरीला गेल्या आहेत. आपली संस्कृती आणि अध्यात्मिकता समजण्यासाठी या मूर्ती प्रभावी साधन असल्याची मूळ अमेरिकन नागरिकांची भावना आहे.

डोंगरात सुमारे १५ फूट उंचीवर विविध प्राणी, शिकारी आणि भौमितिक आकृतींची शिल्प आहेत. त्यापैकी ४ मूर्तींची चोरी करण्याबरोबरच चोरट्यांनी इतर अनेक शिल्पांचे अपरिमित नुकसान केले आहे. चोरट्यांनी जिन्याच्या आणि शिडीच्या सहाय्याने मूर्तीपर्यंत पोहोचून दगड कापण्याच्या यंत्राने या मूर्ती पर्वतातून अक्षरश: कापून काढल्या आहेत.

Leave a Comment