चेतेश्वर पुजारा जखमी

मुंबई: इंग्लंड संघाबरोबर सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत सलग दोन शतके ठोकणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा ‘संकटमोचक’ फलंदाज मैदानावर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेल्या कसोटीचा खेळ सुरू असताना शनिवारी शोर्ट लेग या स्थानावर क्षेत्ररक्षण करणार्या पुजाराच्या छातीवर जोरदार वेगाने आलेला चेंडू आदळला आणि तो जायबंदी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात तातडीचे उपचार आणि तपासण्या सुरू आहेत. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला.

या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची कागदावर मजबूत असलेली फळी फोडली. मात्र पुजाराच्या शतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान दिले.

राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजाराकडे भारतीय फलंदाजीची नवी भिंत म्हणून पहिले जात आहे.

Leave a Comment