गुजराथमधील मुस्लीमांना वळविण्यात मोदींना यश

अहमदाबाद दि. २४ -अगदी तोंडावर येत असलेल्या विधानसभा आणि त्याच्या ताणांतून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नक्कीच दिलासा मिळावा अशी परिस्थिती गुजराथमध्ये निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. मोदींनी गुजराथमधील मुस्लीम समाजाला त्यांच्याकडे आकर्षून घेण्यात यश मिळविले असून त्यात प्रामुख्याने मुस्लीम युवा मतदारांचा समावेश आहे. या तरूणांवर मोदींचा चांगला प्रभाव पडला असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुस्लीम संघटनांच्या जॉईंट कमिटीचे अध्यक्ष सय्यद शहाबुद्दीन यांनी मोदींबाबत असलेल्या मुस्लीम समुदायाच्या भावनांत नक्की बदल होतोय असे सांगितले आहे. त्यामुळे मोदींच्या गुजराथ नवनिर्माण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविर्याेसाठी मुस्लीम समाज कांही अटींवर त्यांना पाठिबा देण्यास तयार आहे. इतकेच नव्हे तर या अटी मान्य केल्यास २००२ च्या दंगलीही विसरण्यास तयार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे मुस्लीमांसाठी केलेल्या चांगल्या कामांची पावतीही या समुदायाने मोदींना कधीही दिलेली नाही हा इतिहास आहे.

शहाबुद्दीन यांची मागणी आहे की गुजराथ दंगलींबाबत मोदी यांनी दिलगीरी व्यक्त करावी व गुजराथमध्ये मुस्लीम लोकसंख्या १० टक्के आहे त्या प्रमाणात आमच्या समाजाला निवडणुकांसाठी २० जागा द्याव्यात. तसेच शिक्षण, रोजगार या विकास कामात समान फायदे दिले जावेत. अर्थात मोदींकडून त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे संकेत मिळत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे व त्यामुळे या निवडणुका मोदींसाठी अधिक सोप्या ठरण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

गुजराथेत विधानसभा निवडणुकांसाठी १३ व १७ डिसेंबर या दोन तारखांना मतदान होत असून निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

Leave a Comment