शेतकऱ्यानाही जाणीव हवी

sugarcane4

ऊस पिकविणारा शेतकरी आणि साखरेच्या किमती यांच्या संबंधात समाजात असणारे गैरसमज, सरकारचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण झालेले राजकारण या सगळ्या गोष्टींमधून शेतकऱ्यावर होणारा अन्याय यांचा विचार आपण केला. परंतु आपल्या या परिस्थितीमध्ये काही परिवर्तन घडवावे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा फारसे जागरूक आणि सावध नाहीत, असे दिसून आले आहे. उसाच्या किमतीचा प्रश्न हा प्रामुख्याने ऊस उत्पादनासाठी येणार्याग खर्चाशी निगडित आहे.

सरकार किंवा साखर कारखाने उसाला जो भाव देतात त्या भावातून शेतकऱ्याना जेवढे पैसे मिळतात त्या पैशातून त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही, अशी शेतकऱ्याची तक्रार असते. शेतकऱ्याना लागणार्याठ वस्तूंच्या किमती भराभर वाढत आहेत, परिणामी त्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. परंतु हा खर्च ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणात त्याच्या मालाच्या किमती वाढत नाहीत वगैरे तक्रारीही असतात. परंतु या गोष्टींचा एकाच बाजूने विचार करून चालणार नाही.

शेतकऱ्याला लागणार्याव वस्तू कितीही महाग झाल्या तरी शेतकऱ्यानी सुद्धा आपला उत्पादन खर्च कसा आटोक्यात राहील याचा प्रयत्न केलाच पाहिजे. नाही तर आपण बेदरकारपणे शेती करणार, वाट्टेल तसे खर्च करणार, दुलर्क्ष करणार आणि राजू शेट्टींनी मात्र आंदोलन करून आपल्याला चांगला भाव मिळवून द्यावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते.

सध्या सार्याज जगात मुक्त अर्थव्यवस्था राबवली जात आहे आणि या अर्थव्यवस्थेमुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. सारे उत्पादक आणि कारखानदार कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगला माल कसा देता येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असा माल देऊन सुद्धा आपल्याला अधिक नफा मिळावा या दृष्टीने उत्पादन खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

तसा आपला शेतकरी आपल्या उत्पादन खर्चाचा कधी विचार करतो का? काही अपवाद वगळता बहुतेक शेतकरी आपल्या खर्चाचे कसले हिशोबच ठेवत नाहीत. ते त्यांनी ठेवले पाहिजेत आणि आपल्या शेतात कुठे वायफळ खर्च होत आहे का? यावर बारकाईने विचार केला पाहिजे. उसाच्या उत्पादन खर्चाच्या बाबतीत आपण कधी सावधपणे विचारच केला नाही तर आपल्याला उसाला कितीही भाव मिळाला तरी तो शेवटी परवडणारच नाही.

उसाला मोठ्या प्रमाणावर रासायनिक खत वापरल जात असते. परंतु बरेच शेतकरी तो खत उधळून टाकत असतात. सध्याच्या मोकाट पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. त्या सिंचनाच्या माध्यमातून रासायनिक खत पुरवावे, असा विचार फार कमी शेतकरी करतात. मुळात रासायनिक खत वापरावेच का? त्याला पर्यायी असा सेंद्रीय खत वापरून खर्चात बचत करता येणार नाही का? याचाही विचार केला पाहिजे. आपल्या शेतातला काडीकचरा, जनावरांचे शेणमूत्र यांचा वापर करून रासायनिक खतावरचा खर्च वाचवता येईल. बरेच शेतकरी ऊस काढून नेला गेला की, पाचट जाळून टाकतात. अशा रितीने आपण पाचट जाळून टाकत असू तर शेतातले गांडुळासारखे कृमी कीटक मरणार नाहीत का? तेव्हा पाचट जाळण्याच्या ऐवजी कुजवून त्याचे खत करावे. असा विचार शेतकरी करतात का?

ठिबक सिंचनामध्ये पाण्याची, रासायनिक खताची बचत करण्याची ताकद आहेच. परंतु त्यामुळे शेतभर तण वाढत नाहीत आणि खुरपणाचेही खर्च कमी होतात. परिणामी औषधांचे खर्चही वाचतात. अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपण कमीत कमी खर्चामध्ये अधिक ऊस उत्पादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला भाव परवडेल.
   
अनेक शेतकरी ऊस लावल्यानंतर तो चांगला वाढेपर्यंत उसात मिश्र पीक घेतात. कोणी कोथिंबीर लावतात तर कोणी अन्य छोटी झाडे लावून तोपर्यंतच्या काळात चार पैसे कमवून घेतात. हे जर शक्य आहे तर सगळेच शेतकरी असे का करत नाहीत, असा प्रश्न मनात आल्या-शिवाय रहात नाही. खरोखर ऊस पीक परवडावे असे वाटत असेल ते आपल्या बरोबरच साखर कारखान्यालाही किफायतशीर ठरावे असे वाटत असेल तर कमीत कमी खर्चात एकरी किमान ५० टन ऊस उत्पादन आणि उसाचा उतारा १६ टक्के ही ऊस उत्पादनातली आदर्श स्थिती आहे. काही मोजकेच शेतकरी एकरी ६०-७० टनापेक्षा अधिक उत्पादन घेतात हे खरे. परंतु सर्वसाधारण शेतकर्यां च्या उसाचा उतारा एकरी ३० टनापासून ४५ टनाच्या दरम्यानच असतो. त्याच्या उतार्याउची तर कोणी काळजीच करत नाही आणि हे उत्पन्न काढत असताना कमीत कमी खर्चात कसे काढता येईल याचा शेतकरीही विचार करत नाही.

ही शेती आणि हे उसाचे उत्पादन म्हणजे जमिनीचा गैरवापर आहे. हे आपल्या देशाचे नुकसान तर आहेच, पण त्यापेक्षा खुद्द शेतकऱ्याचे आणि साखर कारखान्यांचेही नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी सुद्धा सावध झाले पाहिजे.

Leave a Comment