नवी दिल्ली: भारत आणि चीन परस्पर सहकार्याची कितीही भाषा करीत असले तरीही चीनच्या दांडगाईच्या धोरणामुळे या देशातील सीमावाद वारंवार उफाळून येतो. चीनने पुन्हा अरुणाचल आणि अक्साई चीनचा समावेश चीनच्या नकाशात केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. याचा परिपाक म्हणून भारत आणि चीनमध्ये सीमावादाला तोंड फुटले आहे.
अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भारतीय प्रदेशांचा चीनच्या नकाशात समावेश केलेले नकाशे चीनने त्यांच्या ई – पासपोर्टवर छापून भारताची काळ काढली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने चीनकडे नाराजी व्यक्त करण्याबरोबरच चीनमधील भारतीय दूतावासाकडून अरुणाचल आणि अक्साई चीन भारतात असल्याचे दाखविणारे नकाशे असलेले व्हिसा चीनी नागरिकांना देऊ लागले आहे.
यापूर्वीही अरुणाचल मधील भारतीय अधिकार्यांना व्हिसा नाकारून आणि जम्मू काश्मीरच्या नागरिकांना ‘स्टेपल्ड व्हिसा’ प्रदान करून चीनने आगळीक केली आहे.