सर्व इलेक्ट्रोनिक उपकरणे म्हणजे अगदी लॅपटॉप, मोबाईल्स, टॅब्लेटसही चार्ज करू शकणारी स्मार्ट बॅग तयार केल्याचा दावा संशोधकांनी केला असून ‘ फोर्स‘ असे या बॅगेचे नामकरण करण्यात आले आहे. ही बॅग मोठ्या प्रमाणावर बनविण्यासाठी अनुदाने गोळा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
वॉटर प्रूफ कव्हर असलेल्या या बॅगेचे डिझाईन विशिष्ठ पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यात महागडी आणि महत्त्वाची इलेक्ट्रोनिक उपकरणे ठेवण्यासाठी विशिष्ठ पॉकेटचाही समावेश आहे. विशेष म्हणजे उपकरणांच्या आकारनुसार ही बॅगही आपला आकार बदलते. तसेच ती पाठीवर लावता येते, खांद्याला लावता येते किंवा सूटकेसप्रमाणेही वापरता येते. ब्लू टूथच्या सहाय्याने ही बॅग स्मार्टफोनला जोडली जाते. शिवाय समजा आपली बॅग कॉफी शॉप अथवा रेस्टॉरंटमध्ये कुणी विसरला तर ही बॅग तुमच्या फोनवर रिमांडरही पाठवू शकते असेही संशोधकांचे म्हणणे आहे.