रोबो करणार अणुप्रकल्पांची निगराणी

टोकियो दि.२२ – जपाममध्ये गेल्या वर्षातील भूकंप आणि त्सुनामीत फुकुशिमा येथील अणुप्रकल्पात झालेला विध्वंस आणि त्यामुळे माजलेला हाहाःकार आजही विसरला गेलेला नाही. जपानच्या तोशिबा कंपनीने अणु प्रकल्पांची निगराणी करण्यासाठी चार पायांच्या वैशिष्ठ्यपूर्ण रोबोची निर्मिती केली असून हा रोबा इटालियन एचवायक्यू आणि बोस्टन डायनॅमिक्सच्य  बिग डॉग रोबोंच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. तोशिबाने कालच असा रोबो तयार केल्याची घोषणा केली आहे.

कंपनीच्या अधिकार्यां कडून मिळालेल्या माहितीनुसार इटालियन आणि बोस्टनमधले रोबो हायड्रोलिक पॉवरवर चालतात तर हा रोबो एलेक्ट्रीक पॉवरवर चालतो इतकाच फरक नाही तर या रोबोला मजबूत चार पाय आहेत. ६५ किलो वजनाचा हा रोबो तासात १ किमी अंतर कापू शकतो शिवाय खडबडीत, उंचसखल जागेत तो तितक्याच क्षमतेने चालू शकतो तसेच जिने चढउतारही करू शकतो. याची बॅटरी दोन तास चालू शकते आणि अणुप्रकल्पातील सर्व मशिनरी तो नियंत्रणात ठेवू शकतो. त्याच्यावर कॅमेरा आहेच पण या रोबोवरच केबल कनेक्ट कॅमेरा असलेला छोटा रोबोही आहे. हा छोटा रोबो अडचणींच्या जागेत निरीक्षण करण्यासाठी सुटा करूनही पाठविता येतो. अणुप्रकल्पात कांही अपघात झाले तर या रोबोचा वापर अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.