नवी दिल्ली दि.२२ – मुंबईवरच्या २६/११ च्या हल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला काल पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशीवर चढविण्यात आले. कसाबला फाशी देण्यासाठी वापरण्यात आलेला फाशी दोर प्रत्यक्षात पाच वर्षांपूर्वीच संसदेवर हल्ला करणार्या् अफजल गुरूसाठी वळण्यात आला होता असे वृत्त हिंदुस्थान समाचारने दिले आहे.
अफजल गुरूला फाशी होणार हे नक्की होतेच. कारण देशाच्या मानबिदूवरच त्याने हल्ला चढविला होता आणि त्यात सहा जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. २००१ सालात ही घटना घडली होती. त्याला फाशी सुनावली गेली तेव्हाच बिहारच्या बक्सर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून फाशीचा हा दोर वळून घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर गुरूच्या शिक्षेवर अम्मलबजावणी होण्यास वेळ लागला. गेली पाच वर्षे हा दोर कारागृहातच पडून होता. दरम्यान अन्य कुणालाही फाशी दिली गेली नसल्याने या दोरासाठी अधिकृतरित्या मागणीही आली नाही.
मात्र कसाबला फाशी देण्याचे निश्चित झाल्यानंतर हा दोर तेथून येरवडा कारागृहाकडे मागविण्यात आला असे सांगण्यात येत आहे. म्हणजे अफजलचा फास अशा तर्हेमने कसाबला बसला असे मतही व्यक्त होत आहे.