राज यांनीच दिले कार्यकर्त्यांना दूर राहण्याचे आदेश

पुणे दि.२१ – सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरे यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना यात्रेदरम्यान सहभागी न होण्याचे तसेच त्याविषयी कोणतेही मत प्रदर्शित न करण्याचे आदेश जाणीवपूर्वक दिले होते असे मनसेचे महासचिव आणि राज यांचे विश्वासू अनिल शिदोरे यांनी स्पष्ट केले आहे.

शिदोरे याविषयी अधिक स्पष्टीकरण देताना म्हणाले की राज साहेबांचीच अशी इच्छा होती की बाळासाहेबांचे निधन हा त्यांचा कौटुंबिक मामला आहे व त्यामुळेच कार्यकर्त्यांनी सुरवातीपासून त्याच्याबरोबर येऊ नये. राज अंत्ययात्रेत पायी आले त्यामागेही ते सेना सुप्रीमोंच्या पावलावर पाऊल टाकूनच वाटचाल करणार आहेत असाच संदेश होता. यामुळेच ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंत्ययात्रेत सामील झाले आणि शिवाजी पार्कवर आल्यानंतरच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना जॉईन झाले. यामागे राज यांना दूर ठेवल्याचा किवा राज मुद्दामच अलिप्त राहिल्याचा जो आरेाप होत आहे त्यात कांहीही तथ्य नाही.

Leave a Comment