शेतकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव

ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरू होते तेव्हा शहरातल्या लोकांचा, पत्रकारांचा आणि सामान्य जनतेचाही अशा आंदोलनाला पाठींबा मिळत नाही. ही मंडळी आंदोलनाविषयी जी काही मते व्यक्त करतात ती ऐकली  म्हणजे त्यांच्या मनात शेती, शेतकरी आणि विशेष करून बागायतदार यांच्याविषयी किती गैर समज निर्माण झालेले असतात याचे दर्शन घडते. मुळात ऊस बागायतदार म्हणजे भयंकर श्रीमंत, अशी एक कल्पना लोकांच्या मनात रुजलेली असते. विशेषतः मराठी चित्रपटांनी बड्या शेतकर्यांयची ही प्रतिमा लोकांच्या मनात कायम केलेली आहे.

प्रत्यक्षात बडा शेतकरी सतत निसर्गाशी झगडा करत असतो आणि जमा-खर्चाचा ताळमेळ जुळवता जुळवता त्रस्त होऊन कसेबसे जीवन जगत असतो. ज्यांनी हे जीवन जवळून पाहिलेले नसते ते लोक कादंबरी आणि चित्रपटातल्या प्रतिमेवरच अवलंबून असतात आणि बागायतदार म्हणजे मोठा श्रीमंत आणि सुखासीन माणूस असतो अशा कल्पना करत असतात. त्यामुळेच त्यांच्या हमीभावाच्या मागणीला सहानुभूती दाखविण्याचे काही कारण नाही, त्यांच्याकडे खूप पैसा असतो आणि ते केवळ जास्त भावाचे आंदोलन करून नाटक करत असतात, अशी या लोकांची कल्पना असते.

आंध्र प्रदेशातल्या काही शेतकर्यांेनी गतवर्षी तांदळाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे डावपेचाचा एक भाग म्हणून भाताची लागवडच केली नाही. तेव्हा खळबळ उडाली. शेतकरी असे काही करतो ही कल्पनाच अनेक शहरी अर्थतज्ज्ञांना पचली नाही आणि हे शेतकरी आपले खिसे भरण्यासाठी लोकांची अशी अडवणूक करून शेती पिकवण्याचेच थांबवत आहेत अशी टीका त्यांनी केली. एका मोठ्या मराठी दैनिकामध्ये एका स्तंभलेखकाने या संबंधात एक पत्र लिहिले होते. ते पत्र म्हणजे या शहरातल्या कथित बुद्धीवादी लोकांचा शेतकर्यांैकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा हिणकस आहे याचे द्योतक होते. तांदूळ पिकविणार्याी शेतकर्यां ना कसल्याही प्रकारच्या हमी भावाची गरजच नाही असे या स्तंभलेखकाचे मत होते आणि याचे कारण काय? तर हे शेतकरी खूपच धनाढ्य असतात. १९७० च्या दशकामध्ये तांदळाच्या भावाविषयी काही पाहणी करण्याकरिता काही अर्थतज्ज्ञ आंध्र प्रदेशात गेले होते. तेव्हा हा शोध त्यांना लागला.

हे तज्ज्ञांचे मंडळ एका मोठ्या शेतकर्या्च्या घरी चहा-पानासाठी गेले असताना त्यांना ज्या क्रोकरीमध्ये चहा दिला गेला ती क्रोकरी पॅरिसमधून आयात केलेली होती. या तज्ज्ञमंडळातील काही लठ्ठ पगार घेणार्या  अधिकार्यां च्या घरात सुद्धा अशा प्रकारची क्रोकरी नव्हती आणि ज्या शेतकर्यां्ची अवस्था वाईट आहे असे समजले जाते त्या शेतकर्यां च्या घरात मात्र ही भारीची क्रोकरी होती. ते बघून त्या तज्ज्ञांना मठे आश्चर्य वाटले. ही आठवण सांगून या स्तंभलेखकाने शेतकरी किती श्रीमंत असतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

आता या एका उदाहरणावरून शहरातल्या मंडळींचा शेतकर्यांनकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे लक्षात येते. ज्या शेतकर्याकच्या घरी हे लोक गेले होते तो शेतकरी केवळ शेती करणारा होता, की शेती करून शेतीच्या सोबत अन्य काही व्यवसाय करणारा होता याचाही काही उलगडा झाला नाही. परंतु आपल्या देशामध्ये नाममात्र शेती करणारे अनेक लोक आहेत. त्यांचे शहरामध्ये खूप मोठे उद्योग असतात, दुकाने असतात. अशा मंडळींपैकी काही लोक राजकारणातही कार्यरत असतात आणि काही लोक राजकारणातून भल्या-वाईट पद्धतीने बक्कळ कमाई सुद्धा करत असतात. अशा लोकांना आपण शेतकरी समजणार असू तर आपल्याला शेतकर्यांसचे खरे दुःख कधीच कळणार नाही.

एखादे सरकारी शिष्टमंडळ किवा तज्ज्ञांचे मंडळ पाहणी करण्याकरिता येते तेव्हा त्यांच्या चहा-पानाची व्यवस्था अशाच एखाद्या मातबर शेतकर्या कडे केली असणार. जो राजकीय पुढारी असेल, अनेक व्यवसायात गुंतलेला असेल आणि शेती ही केवळ आहे म्हणून तो करत असेल. अशा माणसाच्या घरामध्ये भारीची क्रोकरी सापडली याचा अर्थ सगळेच शेतकरी पॅरिसमधून आणलेली क्रोकरी वापरतात असा होत नाही. याही शेतकर्याेकडे ती होती याचा अर्थ ती त्याच्या मालकीचीच होती असाही होत नाही. बडे लोक आपल्याकडे चहापानाला येत आहेत म्हणून त्याने ती दुसर्यां ची मागून सुद्धा आणलेली असू शकते.

परंतु त्या घरात ती क्रोकरी होती म्हणजे सगळेच शेतकरी श्रीमंत झाले आणि त्यांना आता शेतीमालाला भाव देण्याची गरजच नाही असा निष्कर्ष कोणी काढत असेल तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल. परंतु हा मूर्खपणा सुद्धा जाणूनबुजून केलेला असतो आणि शेतकर्यांढच्याविषयी मनात निर्माण झालेल्या धनाढ्य शेतकरी या प्रतिमेतून निर्माण झालेल्या द्वेषापोटी केलेला असतो. तेव्हा एकदा अशा लोकांनी शेती, शेतीची व्यवस्था, तिला सतत बसणारे निसर्गाचे तडाखे या सगळ्यांचा पूर्वग्रह सोडून विचार केला पाहिजे. 

Leave a Comment