गुगल अॅपवर डिसेंबर गायब

गुगल मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमध्ये शिरलेल्या बगने किवा विषाणूने कॅलेंडरमधील डिसेंबर महिनाच गायब करून टाकला असल्याची तक्रार युजर करत आहेत. त्यामुळे नाताळची सुट्टी, सुट्टीचे वेळापत्रक ठरविण्यात युजरना अडचणी येत आहेत. यंदा नाताळ नाही त्यामुळे कोणतेही प्लॅंनिंग नाही, शुभेच्छा नाहीत, प्रेझेंट नाहीत एकूण कोणताही खर्चच नाही अशा प्रतिक्रीया युजर देत आहेत. गुगलने स्वीकारलेल्या नव्या अॅड्राईड ४.२ मध्ये हा दोष निर्माण झाला आहे.

या बगमुळे कॅलेंडर नोव्हेंबर नंतर एकदम जानेवारी महिनाच दाखवित आहे. त्यावर युजरनी ऑनलाईन प्रतिक्रिया देण्याचा धडाकाच लावला असताना गुगलने मात्र कोणतेही स्पष्टीकरण अद्यापी दिलेले नाही. अँड्राईड ४.२ चा वापर अनेक उपकरणात केला गेला असून गुगलच्या गॅलॅक्सी नेक्सस व नेक्सस -७ टॅब्लेटमध्येही हीच सिस्टीम वापरली गेली आहे. मात्र अन्य मोबाईल उपकरणात कॅलेंडरमधला डिसेंबर इनटॅक्ट आहे फक्त गुगलच्या उपकरणांतूनच तो गायब आहे असे समजते.