राखी सावंत देणार सेक्सचे धडे

बॉलिवूडमधील आयटम गर्ल आणि नेहमी चर्चेत असणारी राखी सावंत चक्क सेक्सचे धडे देणार आहे. ती सेक्स टिचरच्या भूमिकेत दिसणार आहे. राखी सावंत सेक्स टिचर बनून विद्यार्थ्यांना ज्ञान देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राखी आपल्या आगामी चित्रपटात सेक्स टिचर म्हणून काम करणार आहे. ’कसम से कसम’ हा राखीचा नवा चित्रपट येत आहे. या सिनेमात राखी सेक्स टिचरच्या भूमिकेत असणार आहे.

’कसम से कसम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अशफाक मकरानी असणार आहेत. या सिनेमामध्ये राखी सेक्सी ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांना सेक्य विषय ज्ञानाचे धडे देणार असल्याचे पाहायला मिळेल. मात्र, हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. राखीची नवी भूमिका कशी असेल, याबाबत उत्सुकता आहे

Leave a Comment