लखनौ दि. १७ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांचे ज्योतिषी रमेश तिवारी यांच्या खूनाचा तपास करण्यासाठी जौनपूर पोलिस ठाण्यातून विशेष पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे समजते. जिल्हा पोलिस करत असलेल्या तपासात हे पथक मदत करणार आहे.

याविषयीची हकीकत अशी जौनपूर येथे राहणारे ३४ वर्षीय रमेश तिवारी हे मुलायमसिंग यांचे ज्योतिषी होते. गुरूजी याच नावाने परिचित असलेल्या तिवारी यांचा काल ते घराबाहेर कुटुंबियांसमवेत बसले असताना खून झाला. मोटरसायकलवरून पोलिसांच्या वेशात आलेल्या दोन तरूणांनी त्यांना गोळ्या घातल्या त्यात तिवारी यांच्या भाऊही जखमी झाला. तिवारी यांना ताबडतोब सुलतानपूर येथील रूग्णालयात हलविले गेले मात्र डॉक्टरांनी ते मरण पावले असल्याचे जाहीर केले. त्यांच्या भावाला लखनौला हलविण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल वरून आलेले हे दोन अज्ञान तरूण त्यांच्या पाया पडले व कपड्यातून दडवून आणलेल्या स्वयंचलित पिस्तुलातून त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना घडताच पोलिस उपमहासंचालक अरूणकुमार यांनी तातडीने जौनपूरला भेट दिली आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त वाढविला. पोलिसांना तपासात मदत करण्याचे आदेश अरूणकुमार यांनाच देण्यात आले आहेत असेही समजते व त्यानुसारच पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.