पुरूष वर्गासाठी रेमंडने आणला बिअर शांपू

beer

नवी दिल्ली दि.१६- मेन्स अॅपरल क्षेत्रातील बलाढ्य आणि नामवंत कंपनी असलेल्या रेमंडने त्यांच्या पार्क अॅन्हेन्यू ब्रँडखाली भारतीय बाजारात बिअर शांपू आणला असून येत्या दोन आठवड्यात तो बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. भारतीय बाजारपेठेत बिअर शांपू प्रथमच येत आहे.

पुरूषांच्या कॉस्मेटिकसची भारतातील बाजारपेठ गेल्या कांही वर्षात सातत्याने वाढत आहे. या बाजारपेठेची उलाढाल ३ हजार कोटींची आहे आणि त्यात प्रामुख्याने डिओडोरंट, फअरनेस क्रिम, आफ्टर शेव लोशन, जेल, हेअर क्रिम ,अँटी रिंकल क्रिम, बॉडी वॉशर यांचा समावेश आहे. या बाजारपेठेची वाढती व्याप्ती आणि तरूण वर्गाची ही उत्पादने वापरण्याकडे असलेली प्रवृत्ती लक्षात घेऊन रेमंडसने बिअर शांपू आणला असून यंग स्टायलीश तरूण पिढी हेच त्यांचे टार्गेट आहे.

या विषयी अधिक माहिती देताना कंपनीचे वरीष्ठ अधिकारी अनिल कुलकर्णी म्हणाले की सध्या भारतात क्लिअर आणि हेड अॅन्ड शोल्डर हे शांपू पुरूषांसाठी वापरात आहेत. तीन वर्षांपूर्वी अमेरिकन अभिनेत्री कॅथरिन झेटा जोन्स हिने तिच्या केसांच्या सौदर्याचे रहस्य बिअर शांपू असल्याचे उघड केले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन हा शांपू तयार केला गेला आहे. वास्तविक कंपनीने हा शांपू पूर्वी छोटया प्रमाणावर बाजारात आणला होता मात्र आता तो मोठ्या प्रमाणावर बाजारात आणला जात आहे. बिअर मध्ये असलेल्या माल्ट आणि हॉप या बेसिक तत्त्वांची प्रोटीनशी सांगड घातल्यामुळे केसांचे पोषण चांगले होते तसेच ते मजबूत होतात असे आढळून आले असल्याचेही ते म्हणाले.

रेमंडची पार्क अॅव्हेन्यू ब्रँडखाली डिओडोरंट, सोप, फेसवॉश, शेव्हिंग क्रिम, जेल, लोशन, हेअर क्रिम ही पुरूषांसाठीची प्रसाधने बाजारात यापूर्वीच आणण्यात आली आहेत. मात्र बिअर शांपू प्रथमच बाजारात आणला जात आहे.

Leave a Comment