सडेतोड, परखड, रोखठोक

बाळासाहेब ठाकरे हे एक आगळेवेगळे व्यत्तिमत्व होते. भारताच्या राजकारणामध्ये अनेक नेते चमकून गेले. त्यातले बरेचसे नेते पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ते होते. आताच्या काळात काही राजकारणी हे कारखानदार कम नेते आहेत. काहींनी अभिनेता कम नेता होण्याचा मान मिळवलेला आहे. परंतु व्यंगचित्रकार म्हणून काम करत करत एवढा लोकप्रिय झालेला नेता जगात कोणी नसेल. १९६० साली संयुत्त महाराष्ट झाला. परंतु एवढे होऊनही मुंबईतला मराठी माणूस परकाच राहिलेला आहे, पोट भरण्यासाठी आवश्यक अशा नोकर्यांामध्ये दक्षिण भारतीयांचीच भरती व्हायला लागलेली आहे हे बाळासाहेबांच्या संवेदनशील मनाने टिपले आणि या विसंगतीमुळे अस्वस्थ झालेल्या बाळासाहेबांनी आपली ही अस्वस्थता व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यत्त करायला सुरुवात केली. त्या व्यंगचित्राचा प्रभाव असा काही विलक्षण ठरला की, त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. अशा रितीने बाळासाहेब ठाकरे नेते झाले असले तरी ते जातींच्या मतपेढ्यांचे राजकारण करणारे कथित निष्णात नेते कधीच झाले नाहीत. देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणा-साठी आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी जे आवश्यक आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचे मत असे. ते मत ते रोखठोकपणे मांडत असत. ते तसे मांडण्याने कोण दुखावत आहे आणि कोणत्या जातीची मते आपल्या मागे येणार आहेत किवा येणार नाहीत याचा विचार ते कधीच करत नसत. असे ते आगळेवेगळे नेते होते. आपल्या राजकारणामध्ये नेहमी राजकारणाचे जोडे बाहेर काढून आत या, असे नेहमी म्हटले जात असते. सहकाराचे किवा विकासाचे राजकारण करताना हे वाक्य वारंवार वापरले जाते. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही आणि विकासाचे राजकारण हे केवळ पक्षीय राजकारण होऊन बसते. राष्टपतींच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे घडते. त्यामुळे राष्टपतींसारखा देशाच्या लोकशाहीचा सर्वोच्च रक्षणकर्ता निवडताना पक्षीय स्वार्थ बघितले जातात आणि आगामी निवडणुकातील पक्षीय राजकारणाचे आडाखे बांधूनच राष्टपतींची निवडणूक लढवली जाते. परंतु २००७ आणि २०१२ या दोन राष्ट*पती निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातीत भूमिका घेतली. प्रतिभा पाटील या काँग्रेसच्या नेत्या असल्या तरी मराठी आहेत आणि या पदाला त्या योग्य आहेत अशी पक्षविरहित भूमिका घेऊन बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील यांना पाठींबा दिला आणि नुकत्याच पार पडलेल्या राष्टपती निवडणुकीत पी. ए. संगमा यांच्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक योग्य आहेत अशी भूमिका मांडून बाळासाहेबांनी मुखर्जीच्या पारड्यात आपले वजन टाकले. पक्षीय जोडे बाहेर काढून ही निवडणूक झाली पाहिजे हे तत्त्व केवळ बाळासाहेबांनीच पाळले. आपल्या अशा भूमिकेमुळे आपण काँग्रेसच्या जवळ जात आहोत अशी आपली प्रतिमा होईल आणि भारतीय जनता पार्टीशी असलेले आपले संबंध बिघडतील या कशाचीच चिता त्यांनी केली नाही. देशातल्या अन्य सर्व राजकीय नेत्यांपेक्षा बाळासाहेब वेगळे उठून दिसत असत ते यामुळे. पक्षातल्या नेमणुका करताना, आमदारांना तिकिटे देताना बाळासाहेबांनी कधीही जातीची समीकरणे मांडली नाहीत. आज प्रत्येक नेता जातीयवाद संपवण्याच्या गोष्टी बोलतो. परंतु प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा, जात हे भारतातले वास्तव आहे असे काहीसे म्हणत पुन्हा तो जातीय समीकरणांना बळी पडतो. शेवटी जातीयवाद संपवण्यापेक्षा आपल्या राजकीय नफ्या-तोट्याचा विचार अधिक प्रभावी ठरतो. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय लाभापेक्षा शिवसेनेवरच्या निष्ठेला वाव देण्याचा विचार प्रभावी ठरवला आणि कोणत्याही शिवसैनिकाची जात त्यांनी विचारली नाही. काही नेते जातीचे निवारण करण्याच्या नावावर का होईना पण जातींची चर्चा करतात. पण बाळासाहेबांनी चांगले आणि वाईट अशा दोन्ही अर्थांनी जातींची चर्चा कधीच केली नाही. त्यांचे शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम असे आणि या प्रेमात जे लोक न्हाऊन निघाले ते कायम शिवसैनिकच राहिले. गेल्या १५-२० वर्षात शिवसेनेला काही हादरे बसले. छगन भुजबळ हे पक्षातून बाहेर पडले, नंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि अलीकडे खुद्द त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या त्यांच्या पुतण्यानेच त्यांच्याशी फारकत घेतली. एवढे मोठे धक्के बसून सुद्धा बाळासाहेब कधी निराश झाले नाहीत, खचले नाहीत. या लोकांनी बंड केले तेव्हा सुरुवातीच्या काही काळामध्ये जाहीर सवाल-जवाब झाले आणि एकमेकांचे वाभाडे काढले गेले. परंतु या तिन्ही नेत्यांनी वारंवार एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडले असलो तरी शिवसेना प्रमुखांच्या विषयी आमच्या मनात शिवसेनेत असताना जो आदर होता आणि जी श्रद्धा होती तिच्यात आज सुद्धा काही फरक पडलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही दैवतच मानतो आणि राजकीय मतभेद असले तरी त्यांच्या पायावर मस्तक ठेवण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. या तिघांनी व्यत्त केलेल्या या भावनेमधून बाळासाहेब ठाकरे नावाचे व्यत्तिमत्व काय होते याचा प्रत्यय येतो.

Leave a Comment