सोनाक्षी वाट पाहतेय ‘दबंग-२’ ची

‘सन ऑफ सरदार ‘ मधील तिच्या यशस्वी भुमिकेनंतर आता सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसापासून तिच्या बहुचर्चित ‘दबंग-२’ ची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘दबंग’ सिनेमाचा हा सिक़्वेल सर्वत्र २१ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा ती चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान सोबत झळकणार आहे. या सिनेमाकडून सोनाक्षीला खूप काही अपेक्षा असल्याचे समजते.

सोनाक्षी आता सिनेइंडस्ट्रीजमध्ये चांगलीच रुळली आहे. तिला येथील सर्व कामाच्या पध्दतीदेखील काही दिवसातच अवगत झाल्या आहेत. तरी पण तिला काही महत्वाचा निर्णय घ्यावयाचा असेल तर ती त्यासाठी पिता शत्रुघ्‍न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांची मदत घेते. त्यामुळे तिला इतर कोणाच्या मदतीवर अवलंबून राहण्यची वेळ येत नाही. ती नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमामधील तिच्या भूमिकेवर जाम खुश दिसत आहे.

सोनाक्षी म्हणाली, ‘ मी कुठलाही निर्णय घ्वायाचा असेल तर मी आई -वडिलाची मदत घेते. त्यामुळे मला काम करताना कोणतीच अडचण येत नाही. माझ्या आई -वडिलाना सिनेइंडस्ट्रीजचा ३०-३५ वर्षाचा अनुभव आहे. त्यांचा एवढा अनुभव मला येण्यास खूप वेळ लागणार आहे. तरीपण मी नेहमीच त्याच्याकडून काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असते. आगामी कळत येत असलेल्या ‘दबंग-२’ या सिनेमाकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, त्या सर्व अपेक्षा आगमी काळात पूर्ण होतील असे मला वाटते.’