बलात्कार होण्यास फास्टफूड कारणीभूत

rape

हरियाना राज्य गेले कांही दिवस सातत्याने तेथे घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे चर्चेत आले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि तेथील खाप पंचायत त्याची अनेक अतक्र्य कारणेही देताना दिसत आहेत. बलात्काराच्या घटना घडायला नको असतील तर बालविवाह केले जायला हवेत असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी करून स्वतःचे हसे करून घेतले होते. आता खाप पंचायतीच्या एका सदस्याने असाच दुसरा अतर्क्य  मुद्दा मांडला आहे.

जिद जिल्ह्यातील खाप पंचायतीचे लिडर जितेंदर छत्तर यांनी हरियानात बलात्काराच्या घटना घडण्यामागची तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत. चित्रपटात सातत्याने दाखविली जाणारी अश्लील दृष्ये आणि संस्कृतीचा संस्कारांचा अभाव ही दोन मुख्य कारणे आहेतच पण फास्ट फूड म्हणजे चाऊमिन सारख्या पदार्थाचे वाढलेले सेवन हेही तितकेच महत्त्वाचे कारण असल्याचा त्यांचा दावा आहे.

त्यांच्या मते फास्टफूड विशेषतः नूडल्स व चायनीज पदार्थ शरिरावर अनेक परिणाम करतात. हे पदार्थ शरीरात अधिक उष्णता निर्माण करतात व त्यामुळे सेक्स हार्मोन्स स्त्रवण्याचे प्रमाण वाढते व त्यातूनच बलात्काराच्या घटना घडतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर थंड पदार्थांचे सेवन आणि भारतीय संस्कृती आणि संस्कार स्वीकारणे असा उपायही त्यांनी सुचविला आहे.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment