’व्हिसा ऑन अरायव्हल’मध्ये आणखी ९ देश

नवी दिल्ली,१२ नोव्हेंबर-परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारताने ’व्हिसा ऑन अरायव्हल’च्या यादीमध्ये आणखी नऊ देशांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ११ देशांतील नागरिकांना भारतामध्ये ’व्हिसा ऑन अरायव्हल’ची सुविधा दिली जाते. पर्यटन मंत्रालयाचा पदभार नव्यानेच स्वीकारलेले चिरंजीवी यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.

या महिन्याच्या सुरवातीस लंडनच्या ’वर्ल्ड ट्रव्हल माकर्ेट’मध्ये (डब्ल्यूटीएम) ’इन्क्रेडिबल इंडिया’ या मोहिमेचा पुढील टप्पा सुरू करण्यात आल्याची माहितीही चिरंजीवी यांनी दिली. या महोत्सवामध्ये भारताला ’आशियातील पर्यटनात आघाडीचा देश’, ’आशियातील आघाडीचे पर्यटन स्थळ (ताजमहाल)’ आणि ’आशियातील आघाडीचे पर्यटन महामंडळ’ असे तीन पुरस्कार मिळाले.

Leave a Comment