मुंबईत सराईत गुन्हेगार फिरताहेत खुलेआम

मुंबई दि.९ – महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या कांही महिन्यात खंडण्या आणि जमिनी व्यवहारातून होणारे गुन्हे घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असले तरी सर्वसामान्य नागरिकांना काळजी करायला लावतील असे गुन्हे मात्र लक्षणीयरित्या वाढत चालले असल्याचे स्पष्ट होते आहे.

जानेवारी १ ते नोव्हेंबरच्या ४ या दरम्यान नोंदल्या गेलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली असता असे दिसून आले आहे की या काळात १४ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत, कामावर असलेल्या ९ पोलिस हवालदारांवर हल्ले झाले आहेत, अर्ध्या डझनापेक्षा अधिक जबरी चोर्याल झाल्या आहेत, साखळी ओढणे, वाहन चोर्या  तर खूपच मोठया प्रमाणावर झाल्या आहेत. ५ नोव्हेंबरला स्पॅनिश महिलेवर झालेल्या बलात्कारापाठोपाठ लगेचच २५ वर्षीय तरूणीवर अॅसिड हल्लाही झाला आहे. यामुळे अवघ्या मुंबईकरांचे आयुष्य दहशतीखाली किवा चिंतेने ग्रासले गेले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त एम.के सिंग यांनी शहरात कायदा सुव्यवस्था विस्कळीत असल्याने गुन्हेगार खुलेआम कारवाया करू धजत आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असल्याचे मत व्यक्त केले आहे तर सध्याचे पोलिस कमिशनर हिमांशू रॉय यांनी मात्र कायदा सुरक्षा नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. रॉय यांच्या मते ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या, बलात्कार, चेन स्नॅचिंग यांचे प्रमाण वाढले असले तरी बर्या्चशा गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावलाही आहे. १४ ज्येष्ठ्यांचा हत्या झाल्या आहेत पैकी १३ केसेस पोलिसांनी उकलल्या असून यात ओळखीच्या व्यक्तींकडूनच या हत्या झाल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्पॅनिश महिलेवर झालेला बलात्कार ही मुंबई पोलिसांना कमीपण आणणारी बाब असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

अन्य एका माजी आयुक्तांनी जामीनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक स्थापण्याची तसेच बलात्कार आणि हिट अॅन्ड रन केसेसमध्ये जलदगती न्यायालयांची गरज गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment